श्री पांडुरंग विद्यालय कल्लूर येथे जागतिक महिला दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले)
श्री पांडुरंग विद्यालय कल्लूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थिनी यांनी प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक नादरगे एस. व्ही. यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रे डी. पी. व देवकती पी. बी. यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भोळे आर. आर. यांनी केले. आभार पल्लेवाड एन. ए. यांनी मानले. विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.
