लालबहादूर शास्त्री विद्यालयात जागतिक महिला दिन

0
लालबहादूर शास्त्री विद्यालयात जागतिक महिला दिन

उदगीर (एल.पी.उगीले) येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विद्यालयातील सहशिक्षिका शोभा नेत्रागावकर तर अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे उपमुख्याध्यापक अरुण पत्की तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, पर्यवेक्षक माधव मठवाले, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख विजया गोविंदवाड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अतिथी शोभा नेत्रगावकर यांनी इतिहासातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक अशा दृष्टिकोनातून कर्तुत्ववान स्त्रियांचा उल्लेख करत आजच्या महिलांनी पूर्ण निष्ठेने काम करत राहावे असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात अरुण पत्की यांनी इतिहासातील महिलांच्या कार्याचा उल्लेख करत सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.महिला दिनानिमित्त विद्यालयातील सर्व शिक्षक भगिनींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ राऊत, परिचय व स्वागत अनिता मुळखेडे, सूत्रसंचालन व आभार संगीता लोखंडे यांनी मानले. प्राजक्ता जोशी यांच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख संगीता लोखंडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!