आ.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते १० लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ते कामाचा भूमिपूजन सोहळा !

आ.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते १० लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ते कामाचा भूमिपूजन सोहळा !

अहमदपूर (गोविंद काळे) : परचंडा ता.अहमदपूर येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत १० लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ते कामाचा भूमिपूजन सोहळा आ.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी आमदार पाटील यांनी उपस्थित राहून रोकडोबा देवस्थान येथे मनोभावे दर्शन घेत विकासकामाचे भूमिपूजन केले. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधत केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.

एक लोकप्रतिनिधी सत्तेचा विनियोग जनसामान्यांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी करत असतो. तेच मी ही निरपेक्ष भावनेने मतदारसंघासाठी करतो आहे. आज रस्ते ही बाब दिसायला साधी आहे. मात्र अर्थकारण सुधारायचे असेल तर प्रभावी दळणवळणाची साधने ही अत्यंत महत्त्वाची असतात. मग ती रस्त्याची वाहतूक असेल. अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात रस्ते विकासाला गती देण्याचे काम केले. या पुढील काळातही मतदारसंघात रस्ते अधिक बळकट करण्यासाठी काम करणार आहोत, असे मत आ.बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच ज्ञानोबाजी कदम, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंदराव सुरवसे, माजी उपसभापती तुकाराम पाटील, शहराध्यक्ष अझहरभाई बागवान, माजी चेअरमन दीपकराव जाधव, चेअरमन नारायणराव देशमुख, माजी चेअरमन बालाजीराव रोकडे, संचालक सतीशराव नवटक्के, युवक तालुकाध्यक्ष दयानंदराव पाटील, टाकळगाव सरपंच युवराज घोगरे, कंत्राटदार हुसेन शेख, इकबाल शेख, जिल्हाध्यक्ष ग्रंथालय विभाग नबी सय्यद, धनराज बोडके, प्रतापराव जाधव, नागोराव दादा घोगरे, चेअरमन निळकंठराव गोरटे, कमलाकरराव देशमुख, शेषराव चावरे, बाळू घोगरे, सूर्यकांतराव बेल्लाळे, बाळासाहेबजी घोडके, गफार शेख, सतीशराव हासुळे, गजानन मेकले, ज्ञानेश्वरराव जाधव, बाळू पवार, गोपाळराव कानवटे, भानुदास कांबळवाड, श्रीधरराव जाधव, प्रशांत जाधव, श्री जाधव, बाबु शेरे, विशाल जाधव, तुकाराम रेड्डेवाड, भगवंत मुंडे, संगम कापसे, तुकाराम बापू जाधव, जनार्दन जाधव, भीमाशंकर रेड्डेवाड, जनार्दन जाधव, अफजल पठाण, इलाही शेख ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author