शिक्षकांनी समाजात प्रामाणिकपणे शैक्षणिक मूल्य रुजवावीत – माजीमंत्री बाळासाहेब जाधव यांचे प्रतिपादन

शिक्षकांनी समाजात प्रामाणिकपणे शैक्षणिक मूल्य रुजवावीत - माजीमंत्री बाळासाहेब जाधव यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये परिवारातील सर्व सदस्य कामाच्या व्यापात व्यस्त असल्यामूळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी समाजात त्यंत प्रामाणिकपणे शैक्षणिक मूल्य रुजवावीत असे आग्रही प्रतिपादन माजीमंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले. ते दि.12 रोजी यशवंत विद्यालयात आयोजित सात्कार सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे, व्यासपीठावर उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेशक अशोक पेदेवाड, निर्मला पंचगल्ले,बालाजी माळी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना माजी मंत्री बाळासाहेब अभिव म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात झपाटून काम केल्यानंतर त्याच्या कामाची नोंद समाजामध्ये घेवून त्यांचा सात्कार केला जातो. त्यामुळे शिक्षकांनी विवेक जाग्रत ठेवून सकारात्मक काम करावे असे जाहिर आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य गुणगौरव पुरस्कार कलाशिक्षक श्री महादेव खळुरे यांना मिळाल्याबद्दल त्यांचा माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक राम तत्तापूरे यांनी सुमसंचालन अरुण मोरे यांनी तर आभार गौरव चवंडा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author