लालबहादुर शास्त्री विद्यालयात ‘बैल’ निर्मिती कार्यशाळेचे आयोजन. ‌‌

लालबहादुर शास्त्री विद्यालयात 'बैल' निर्मिती कार्यशाळेचे आयोजन. ‌‌
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात अभ्यास पूरक उपक्रमातंर्गत कला विभागातर्फे मातीपासून बैल निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, व विद्यार्थ्यांमधील कला कौशल्य विकसित व्हावे. यासाठी या कार्यशाळेचे आयोजन 'बैलपोळा' या सणाच्या निमित्याने करण्यात आले होते. या एक दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी बैलांच्या सुंदर प्रतिकृती तयार करून सुंदर सजावटी केल्या होत्या. या कार्यशाळेत विद्यालयातील पाचवी ते दहावी वर्गातील एकूण ९३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला . कार्यशाळेस कलाशिक्षक गुरुदत्त महामुनी व सहशिक्षक संदीप पाटील   यांनी विद्यार्थ्यांना बैलाची प्रतिकृती बनविण्यासाठी मार्गदर्शन केले. या उपक्रमशील कार्यशाळेच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक अंबादास गायकवाड , उपमुख्याध्यापक  संजय कुलकर्णी ,पर्यवेक्षक कृष्णा मारावार ,  लालासाहेब गुळभिले व माधव मठवाले, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार,मिनाक्षी कस्तूरे यांचे मार्गदर्शन लाभले.

About The Author