लाल बहादुर शास्त्री विद्यालयाचा व्हाॕलीबॉल संघ जिल्ह्यात प्रथम

लाल बहादुर शास्त्री विद्यालयाचा व्हाॕलीबॉल संघ जिल्ह्यात प्रथम

उदगीर (प्रतिनिधी) : येथील लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयाचा 14 वर्ष वयोगटाच्या मुलांचा संघ जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळाला. उदगीर तालुक्यातील या संघाने पहिल्या सामन्यामध्ये औसा तालुक्याचा, तर दुसऱ्या सामन्यामध्ये शिरूर अनंतपाळ तालुक्याचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात या संघाने अहमदपूर तालुक्याला पराजित करून प्रथम क्रमांक मिळवला. या संघामध्ये कर्णधार आदित्य जाधव, सदाशिव गव्हाणे, सुजल रोट्टे, ऋषिकेश तरवडे, श्रीनिवास चामे, आयुष ईलतेपवार, शादुलखान पठाण, सोहम टोंकाकोटे, जमीर शेख, रुद्रप्रताप मळभागे, रहीम शेख या खेळाडूंचा सहभाग होता. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक संतोष कोले,सतिश पाटील,मेहमूद खान, आनंद जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा आणि स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासूने, प्रशालेचे मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी शेख, शिक्षण विस्तार अधिकारी बोईनवाड, पर्यवेक्षक कृष्णा मारावार, मूल्यमापन विभाग प्रमुख भास्कर डोंगरे, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार यांनी खेळाडू विद्यार्थ्यांना धाराशिव येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!