जिल्हास्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेत समर्थ चा संघ प्रथम

जिल्हास्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेत समर्थ चा संघ प्रथम

उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १७ वर्ष वयोगटातील व्हाॅलीबाॅल चा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम आला आहे. लातूर येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत व्हाॅलीबाॅल (मुले), उदगीर तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवले आहे. हे खेळाडू विभागीय स्पर्धेत खेळणार आहेत. या यशाबद्दल संस्था सचिव, प्राचार्य प्रमोद चौधरी, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, रसूल पठाण, क्रिडा समन्वयक किरण हाळीघोंगडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!