नागतिर्थवाडी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रम
देवणी (एल.पी.उगीले) : तालुक्यातील मौजे नागतिर्थवाडी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले गोविंद लिंगराम येलमटे यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद शाळा नागतिर्थवाडी येथील ध्वजारोहण उपसरपंच कै. विष्णुदास विठ्ठल गुणाले यांचे सुपुत्र पांडुरंग गुणाले यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे स्वातंत्र महोत्सवी वर्ष व गावचे उपसरपंच कै.विष्णुदास विठ्ठल गुणाले यांच्या वर्षश्राद्ध निमित्त त्यांच्या स्मरणार्थ सरपंच राज गुणाले यांच्या तर्फे 1.जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थ्यासाठी शालेय बॅग (शाळेचे नाव, विद्यार्थ्याचा फोटो, विद्यार्थ्याचे नाव) मोफत वाटप करण्यात आले.तसेच गावात विविध ठिकाणी गावातील लोक उपयोगी वस्तू व वास्तू यांचा लोकार्पण कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालय येथील बांधण्यात आलेल्या ध्वजांचे ओटे यांचा समावेश आहे. नागरिकांना गावात विविध ठिकाणी बसण्यासाठी ची बैठक व्यवस्था (बँचेस) बनवण्यात आले आहेत त्याचा लोकार्पण सोहळा झाला.सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना पिण्यासाठी पाण्याची टाकी व जनावरांना पाणी पिण्यासाठी पाण्याचा हौद, गावातील विविध ठिकाणी करण्यात आलेले पेव्हर ब्लॉक रस्ते, गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी बसविण्यात आलेल्या सोलार आधारित बोर इत्यादी कामाचे लोकार्पण करून जनतेसाठी वापरास खुली करून देण्यात आले. यावेळी गावातील पोलीस पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रा.पं. सदस्य, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका, शाळेचे मुख्याध्यापक, शाळेच्या शिक्षिका गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.