राष्ट्रनिर्माणात हिंदी राष्ट्रभाषेचे योगदान महत्त्वपूर्ण – शेख शफी कासिम साब
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व साहित्य सम्राट मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबादासराव गायकवाड , प्रमुख अतिथीस्थानी उदगीर येथील गटशिक्षणाधिकारी शेख शफी कासिम साब उपस्थित होते.याप्रसंगी मंचावर विस्तार अधिकारी श्री बोईनवार, साहित्यिक धनंजय गुडसूरकर , उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी ,पर्यवेक्षक कृष्णा मारावार,लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले, अभ्यास पूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार ,हिंदी विषय प्रमुख भास्कर डोंगरे, शोभा नेत्रगावकर हे उपस्थित होते. प्रास्ताविकातून भास्कर डोंगरे यांनी हिंदी राष्ट्रभाषा कशी बनली याची सविस्तर माहिती दिली. हिंदी विभागांतर्गत हिंदी दिनाचे महत्त्व कु. अंबिका ढोबळे व चि. कृष्णा येमेकर यांनी सांगितले .तसेच हिंदी गीत पूजा खरोबे, ऋतुजा पांचाळ यांनी सादर केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते हिंदी व्याकरण हस्तलिखिताचे व प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.तसेच विद्यालयातील हिंदी शिक्षकांचे सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी शेख यांनी हिंदी ही जगातील सर्वात जास्त देशात बोलली जाणारी भाषा आहे, त्याचा सन्मान करावा व शुद्ध हिंदी बोलावे हे सांगितले. याप्रसंगी नववी ‘ह’ वर्गाच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर का अपहरण ही नाटिका सादर केली व वैष्णवी कांबळे,सृष्टी भोईनवाड या मुलींनी हिंदी गीतावर नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबादास गायकवाड यांनी हिंदी भाषेचा दररोजच्या बोलण्यात वापर करावा असा संदेश दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक बिरादार व जनक बिरादार , स्वागत व परिचय चि. यशोधन इंचुरे तर आभार चि.आदित्य जमाले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मी चव्हाण ,डॉ.श्रद्धा पाटील, हिंदी विषय प्रमुख भास्कर डोंगरे ,प्रमोदिनी रेड्डी व विष्णू तेलंग यांनी परिश्रम घेतले.