खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक

लातूर (एल.पी.उगीले) : गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खुनातील आरोपीला डी.बी. पथकाने अटक केली आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे गांधीचौक हद्दीत 11/09/2023 रोजी गंजगोलाई परिसरात शॉपिंग कॉम्प्लेक्सचे छतावर सलमान उर्फ दस्तगीर शाबुद्दीन शेख, (वय 30 वर्ष, राहणार महापूर) याला गुन्ह्यातील संशयित आरोपींनी पूर्ववैमनस्यातून जबर मारहाण करून त्याचा निघृण खून केला होता. खून केल्यापासून गुन्ह्यातील आरोपी फरार झाले होते.

सदरचा गुन्ह्यातील फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधीचौकचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात पथक तयार करून फरार आरोपीचा विविध मार्गाने शोध घेण्यात येत होता. नमूद पथकाने सदर आरोपी वास्तव्य करण्याची शक्यता असलेले विविध ठिकाणी भेटी देऊन बातमीदार तयार केले होते. दरम्यान बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून फरार आरोपी नामे विशाल उत्तम रणदिवे, (रा. देवळी तालुका जिल्हा लातूर.)हा मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात स्वतःचे अस्तित्व लपवून फिरत असल्याचे पथकाला समजले.त्यावरून दिनांक 15/09/2023 रोजी सदरचे पथक मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पोहोचून नमूद आरोपी विशाल रणदिवे यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गांधी चौक येथे आणण्यात आले. त्याच्याकडे नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने पूर्ववैमनस्यातून भांडण होऊन त्याने व त्याचा आणखीन एक साथीदाराने सलमान उर्फ दस्तगीर शेख याला जबर मारहाण करून खून केल्याचे कबूल केले. त्यावरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर क्रमांक 447/2023 कलम 302, 34 भादवि प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने विशाल रणदिवे याची दिनांक 18/09/2023 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोले हे करीत आहेत.तसेच गुन्ह्यातील आणखीन एक फरार आरोपीचा शोध सुरू आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अक्रम मोमीन, पोलीस अमलदार राजेंद्र टेकाळे, दामोदर मुळे, राम गवारे, उमाकांत पवार, दत्तात्रय शिंदे, रणवीर देशमुख, शिवा पाटील यांनी केली आहे.

About The Author