महात्मा फुले महाविद्यालय ‘अमृत महोत्सव रथयात्रा’चे ‘वंदे मातरम् च्या निनादत भव्य स्वागत

महात्मा फुले महाविद्यालय 'अमृत महोत्सव रथयात्रा'चे 'वंदे मातरम् च्या निनादत भव्य स्वागत

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश द्वारा आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम रथयात्राचे आगमन होताक्षणीच’ वंदे मातरम्…’, ‘स्वामी रामानंद तीर्थ की जय…!’ यासह इतर दुमदममणारे नारे देऊन रथयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम कृतज्ञ रथ यात्रेचे स्वागत इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांनी स्वामी रामानंद तीर्थ की जय…. ,वंदे मातरम्,भारत माता की जय…मराठवाडा मुक्ती दिन अमृत महोत्सवी वर्षाचा विजय असो… या नारेंनी महाविद्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. स्वामी , ओम पाटील यांच्यासह दहा जणांचा समावेश या रथयात्रेत सहभाग होता महाविद्यालयात केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!