पु. अहिल्यादेवी विद्यालयात हिंदी दिवस साजरा

पु. अहिल्यादेवी विद्यालयात हिंदी दिवस साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी सु येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव तथा भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्राचार्या रेखाताई तरडे हाके या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून दैवशाला शिंदे, संतोष मुळे, रमेश चेपूरे यांची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्या रेखाताई तरडे हाके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक भाषेला एक विशेष महत्त्व असून आज सबंध देशात सर्वाधिक समजली जाणारी व अवगत होणारी भाषा कोणती असेल तर ती भाषा म्हणजे हिंदी भाषा असून ही भाषा जनसामान्याची भाषा आहे. यावेळी हिंदी विषयाच्या शिक्षिका कौशल्या देवकते यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तर काही विद्यार्थ्यांनी या दिनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी हिंदी विषयाचे अध्यापन करणारे कौशल्या देवकते आणि रमेश चेपूरे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इयत्ता नववीची विद्यार्थीनी सुरनर तनुश्री हिने केले तर आभार इयत्ता नववीची विद्यार्थीनी देवकते शिवानी यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिलानी शेख, तुकाराम शिंगडे,अमोल सारोळे, अच्युत सुरनर, संभाजी दुर्गे, प्रदीप रेड्डी, जनार्दन मासोळे,चिंतन गिरी, गणेश जाधव,तेजस्विनी फाजगे यांच्यासह सर्वांनी परिश्रम घेतले.

About The Author