संस्थेबद्दलचा विश्वास हा सहकार क्षेत्राला उत्तुंग भरारी देतो : गणेश हाके
अहमदपूर (गोविंद काळे) : सहकार क्षेत्रात सबंध भारतात महाराष्ट्राचे नाव अग्रक्रमावर आहे.अनेक सुविधा या सहकार क्षेत्रातील विविध योजनांच्या माध्यमातून अनेकांना मिळत आहेत हे निश्चितच अभिमानाची बाब आहे.आता आपण पाहतोय की सहकार क्षेत्र अत्यंत निकोप होत आहे आणि या सहकार क्षेत्रातील दृढ विश्वास हा सहकार क्षेत्राला निश्चितच उत्तुंग भरारी देतो असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेशदादा हाके पाटील यांनी केले.
ते आज संस्कृती लाॅन्स अहमदपूर येथे आयोजित केलेल्या कै.अशोकराव हाके पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदपूरच्या १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश हाके, पतसंस्थाच्या उपाध्यक्षा तथा श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव व भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्राचार्या रेखाताई तरडे हाके, श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष अमरदीप हाके,जि प शिक्षक सहकारी पतसंस्था चाकूरचे माजी अध्यक्ष स्वामी एस एम, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष ॲड हेमंत गुट्टे,माजी संचालक सावंत सर,कै अशोकराव हाके पाटील पतसंस्थेचे सचिव प्रा संतोष मुळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना गणेश हाके म्हणाले की,सहकारातूनच अनेकांची समृद्धी होते त्यासाठी या क्षेत्राला सर्वांनी भागभांडवलाच्या माध्यमातून समृद्ध करणे गरजेचे आहे, आपल्या ठेवी वाढवणे आवश्यक आहे. याप्रसंगी चाकूर पतसंस्थेचे माजी अध्यक्ष स्वामी यांनी सांगितले की, आमच्या पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा असो की निवडणूका असो यात थोडा गोंधळ होतोच चुरस निर्माण होते पण ही सभा अत्यंत शिस्तबद्ध व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होताना पाहून अभिमान वाटतो.या पतसंस्थेच्या सभासदांनी आता आपले भागभांडवल वाढवण्यावर अधिक भर द्यावा.आपापल्या ठेवी वाढवणे आवश्यक आहे.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश हाके यांनी करताना सांगितले की, पतसंस्थेचा अध्यक्ष म्हणून काम करताना सर्वच कामे अतिशय पारदर्शक केले यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले आज अर्ज आणि उद्या कर्ज या प्रमाणे आपण कर्ज मंजूर केले आणि सभासदांनी सुद्धा आपले कर्ज वेळेवर भरुन सहकार्य केले असे म्हणाले.याप्रसंगी पतसंस्थेत सर्वाधिक शेअर्स असलेली वटसिद्ध नागनाथ प्राथमिक आश्रमशाळा वडवळ नागनाथ या शाळेच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पहिल्या दोन शाळा पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सांगवी आणि कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय मांडणी या दोन शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दैवशाला शिंदे आणि जिलानी शेख यांनी केले तर आभार पतसंस्थेचे सचिव प्रा संतोष मुळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतसंस्थेच्या कोषाध्यक्षा आशा रोडगे, संचालक परमेश्वर पाटील,लक्ष्मण जेलेवाड, संभाजी दुर्गे,इलियास शेख,कमल राठोड, संजीवनी गुर्मे, संतोष नळगिरे, शेषराव हुडगे यांच्यासह हिदायत शेख,अनंत उदगीरे,संजय कजेवाड,उमेश फुलारी यांनी परिश्रम घेतले.