इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्यासाठी कार्यशाळा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : इनरव्हील क्लब च्या पुढाकाराने इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याचे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेसाठी रेखाताई हाके मॅडम यांच्या पुढाकारातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यामागे प्रदूषण रहित गणेश मूर्ती तयार व्हावी विद्यार्थ्यांचा छंद जोपासावा सामाजिक सलोखा निर्माण व्हावा तसेच महिला व बालकांच्या अंगी असलेले गुण बाहेर यावेत या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये १०० जणांनी सहभाग घेतला होता व विद्यार्थी, व इतर क्षेत्रातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला . इनरव्हील क्लब च्या प्रोजेक्ट हेड श्रीमती रेखाताई हाके मॅडम, सौ. शिवालिका हाके मॅडम, अध्यक्ष शीतल मालू, सचिव वर्षा नंदाने, कलावती भातांब्रे, पूजा गुणाले, स्नेहा पोखर्णा यांची प्रमुख उपस्थिती होती. मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण अहमदपूर येथील प्रसिद्ध मूर्तिकार व सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मधील शिक्षक गणेश पांचाळ यांनी दिले. या कार्यशाळेत प्रथम क्रमांक आरव बजाज, द्वितीय क्रमांक अनया पाटील, तृतीय क्रमांक ओम जाजू, उत्तेजनार्थ बक्षीस तौफीक शेख, आरती वाघमारे, सुजाता कांबळे, बालिका चोपडे यांना आकर्षक मूर्ती बनवल्याबद्दल IWC तर्फे बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शमिता नाईक, गणेश कोइलवाड यांनी मोलाचे योगदान दिले.