पालक आणि मुलांचं नातं हे मैत्रीपूर्ण – गणेश हाके

पालक आणि मुलांचं नातं हे मैत्रीपूर्ण - गणेश हाके

अहमदपूर (गोविंद काळे) : मुलांच्या भविष्याविषयी पालकांचे काही स्वप्न असतात. मात्र, आपल्या मुलांचा कल कोणत्या विभागाकडे आहे. याची जाणीव पालकांनी ठेवायला हवी. मुलांचा कल ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. आई-वडिलांनी आपल्या मुलांची मैत्रीपूर्ण नाते तयार करावे मुलांविषयी पालकांची स्वप्न असणं गैर नाही. परंतु, आपले विचार त्यांच्यावर लादणे चुकीचे आहे. त्यांचा कल ओळखून प्रोत्साहन दिल्यास ते अधिक चांगल्या पद्धतीने आपले भविष्य घडवू शकतात. आकाशाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य मुलांनी ठेवायला हवं, तशी स्वप्ने पाहायला हवेत स्वप्नांच्या दृष्टीने वाटचाल करायला हवी.
मुलांनी इयत्ता दहावी-बारावीच्या यशानंतर पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रभावी संवाद कौशल्य, जागतिक भाषांचे आकलन करणे, तंत्रज्ञानाबद्दल माहिती करून घेणे, आत्मविश्वास बाळगणे तसेच अपार मेहनत व कष्ट करण्याची तयारी ठेवावी असे मत बालाघाट तंत्रनिकेतन, रुद्धा -अहमदपूर तथा आद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित नूतन व गुणवंत विध्यार्थी सत्कार सोहळा या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानणावरून बोलताना संस्था अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी मांडले.

यावेळी बालाघाट तंत्रनिकेतन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून घवघवीत यश घेऊन उत्तीर्ण व नवीन प्रथम, थेट दुतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष गणेश हाके यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य स्वप्निल नागरगोजे यांनी केले यावेळी हेमंत गुट्टे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विध्यार्थ्यांनी विविध कालागूण सादर करून नवीन प्रवेशित विध्यार्थाचे स्वागत केले. या वेळी व्यासपीठावर प्रचार्य मदन आरदवाड, संग्राम कोपनर, कालिदास पिटाळे, समीर खुरेशी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रूपा पाटील, अपेक्षा सोनवणे, अश्विनी जाधव, हनुमंत जोहरे, नर्सिंग पिटाळे, शुभम शिंदे, बालाजी लवटे, श्रीराम कागणे, मंगेश चव्हाण, विजय पांचाळ, बालाजी देवकते, विजय कुलकर्णी, महेश सूर्यवंशी, तनवीर सय्यद, अनंद लोहकरे, चोबळीकर तेजस, समाधान गिते,सतीश केंद्रे, गणेश सुरनर, कैलास होनमाने,संतोष होनमाने, संग्राम सुरनर, दुधाटे भरत, विद्या शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष लातुरे यांनी मानले.

About The Author