बालाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पदवीदान समारंभ संपन्न

बालाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पदवीदान समारंभ संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील बालाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सर्वच प्रथम 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संस्थेचे संचालक कुलदीप हाके यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. त्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक कुलदीप हाके यांचे हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.

यावेळी बोलताना कुलदीप हाके यांनी सर्व विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवा व बालाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव सर्व दूर व्हावे असे कार्य सतत आपल्या हातून हो अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर कोषाध्यक्ष अमरदीप हाके, शिवालिका हाके, प्राचार्य मदन आरदवाड तंत्रनिकेतनचे प्राचार्य स्वप्निल नागरगोजेआदी उपस्थित होते. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके व संस्था सचिव प्राचार्य रेखाताई तरडे यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी बालाजी लवटे मंगेश चव्हाण बालाजी देवकते कैलास होनमाने संग्राम सुरनर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष लातूरे तर आभार सतीश केंद्रे यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!