स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाची विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी – उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांचे प्रतिपादन

स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाची विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी - उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : हैदराबाद संस्थानाच्या वर तब्बल सहा पिढ्यापासून निजामाचे राज्य होते. त्यां जोखडा तून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची बाजी लावून मुक्त केले म्हणून विद्यार्थ्यांनी मुक्तिसंग्रामातील बलिदानाची प्रेरणा घ्यावी असे आग्रही प्रतिपादन उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले. दि. 15 रोजी तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी विमलाबाई देशमुख कन्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये उप विभागीय अधिकारी प्रवीण फुलारी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार शिवाजीराव पालेपाड, प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, न प चे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नायब तहसीलदार धनेश दंताळे, बि के मोरे, केंद्रप्रमुख नंदकुमार कोणाले, मुख्याध्यापिका सुनीता कोयले, शोभा राजपंगे, प्राचार्य गजानन शिंदे, मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक बालाप्रसाद काबरा ओ एस सतीश बिलापट्टे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी तहसीलदार शिवाजीराव पालेपाड म्हणाले की, या मुक्ती संग्रामाच्या लढ्यात लातूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. रॅलीचा शुभारंभ स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व लढ्यातील नातेवाईकांचा प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सदरची मुक्ती संग्रामाची रॅली विमलाबाई देशमुख कन्या शाळेपासून महात्मा बसवेश्वर चौक, मधला मारुती, नवजीवन हॉस्पिटल, शिवाजी चौक, आझाद हिंद चौक ,गंजगोलाई, हनुमान मंदिर, काळेगाव रोड, आंबेडकर पुतळा, सावरकर चौका समोरून स्मृती स्तंभाला फेरी मारून या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामातील विविध स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकाच्या वेशभूषा अहमदपूरकरांचे लक्ष वेधित होत्या .या लक्षवेधी रॅलीमध्ये यशवंत विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, रवींद्रनाथ टागोर विद्यालय, विमलाबाई देशमुख, संत ज्ञानेश्वर विद्यालय, नूतन मराठी विद्यालय, कमला नेहरू विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी एन सी सी मुले, मुली, स्काऊट गाईड, पथक आणि विद्यार्थी व विद्यार्थिनींनी, शिक्षक ,महसूल कर्मचारी व नगरपरिषदे चे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी, सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार पुरुषोत्तम माने आणि मानले. सदरची रॅली यशस्वी करण्यासाठी अमृत महोत्सव सोहळा समितीचे सदस्य महादेव खळुरे, बसवेश्वर थोटे, चंद्रकांत पेड, दीपक हलकंचे, शिवकुमार गुळवे यांच्यासह शहरातील विविध शाळचे शिक्षक,महसूल कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author