गणेश भक्तांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे – मनीष कल्याणकर
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर हे शांतता प्रिय शहर असल्याचे सांगून या बैठकीच्या माध्यमातून हिंदू आणि मुस्लिम यांच्या एकतेचे दर्शन झाल झाले असल्याचे सांगून सर्व गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्त विसरजन करून कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन करावे असे आग्रही प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांनी केले. ते दि. 16 रोजी पोलीस स्टेशनच्या वतीने सानवी मंगल कार्यालयात आयोजित गणेश उत्सव, नवरात्र उत्सव व ईद ए मिलादुंबी च्या निमित्ताने शांतता कमिटीच्या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार शिवाजी पालेपाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, वितरण कंपनीचे अभियंता पी जी राठोड, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी खांडेकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य ऍडव्होकेट निखिल कासनाळे, माजी नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, बालाजी आगलावे, मुन्ना सय्यद, रहीम पठाण, उपसरपंच उद्धव इप्पर ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजहर बागवान, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक विश्वंभर स्वामी, ए पी आय करीम पठाण, शेख आयाज यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी म्हणाले की, सर्वांनी पोलीस स्टेशन चा परवाना व नियमाने लाईट घ्यावी, जोशचा होश होऊ नये, मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी वेळेत विसर्जन करावे असे जाहीर आवाहन केले. यावेळी गणेश मंडळाच्या वतीने एडवोकेट किशोर कोरे, प्राध्यापक विश्वंभर स्वामी, बालासाहेब आगलावे, डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, मुन्ना सय्यद, संतोष मजगे, पठाण सद्दाम, गफार कुरेशी यांचे मनोगत पर तर व्यासपीठावरील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले तहसीलदार शिवाजी पालेपाड, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, काकासाहेब डोईफोडे, पी जी राठोड यांचे गणेश पदाधिकाऱ्यांना सूचना वजा मार्गदर्शनपर भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए पी आय करीम पठाण यांनी सूत्रसंचालन उपक्रमशिल शिक्षक राम तत्तापूरे यांनी तर आभार गुप्त शाखेचे रमेश आलापुरे यांनी मानले. या बैठकी चा शुभारंभ गणेशाचे स्तवन आणि गणेशाच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गणेश भक्त पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्तीचे अध्यक्ष महिला नगरसेवक आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. चौकट- खरं म्हणजे यावर्षी गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादुंनबी हे एकाच दिवशी आल्याने मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकमताने आमच्या धार्मिक सोहळ्याची शोभायात्रा दुसऱ्या दिवशी काढत असल्याचे सांगितल्याने या बैठकीमध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले.