स्वातंत्र सैनिकाच्या एकजुटीने हैदराबाद निजामाच्या जुलमी राजवटी च्या जोखडातून मुक्त – प्रवीण फुलारी
अहमदपूर (गोविंद काळे) : निजाम सरकारने अत्यंत अमानुषपणे मराठवाड्यातील जनतेवर मोठ्या प्रमाणावर अन्याय आणि अत्याचार केला होता. पण मराठवाडा मुक्ती संग्रामातील लढवय्या स्वातंत्र्य सैनिकांनी जिद्दीने व एकजुटीने हैदराबादच्या निजामाच्या विरोधात लढल्यानेच मराठवाडा निजामाच्या जुलमी जोखडातून मुक्त झाला असल्याचे प्रतिपादन उप विभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले. ते दि. 17 रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्याच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी तहसीलदार शिवाजी पालेपाड, प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
ध्वजारोहण प्रवीण फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झेंड्याला मानवंदना पोलिसानी दिल्यानंतर राज्य गीत, मराठवाडा गीत व सर्वांसमक्ष प्रतिज्ञे नंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा, महसूल प्रशासनातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा, स्पर्धेचे निरीक्षकांचा आणि अमृत महोत्सव समितीचे सदस्य यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक राम तत्तापुरे यांनी तर आभार गौरव चवंडा यांनी मांनले. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, माजी नगराध्यक्षा सरस्वती ताई कांबळे, डॉक्टर सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि माता पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल प्रशासनातील कर्मचारी आणि अमृत महोत्सव समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.