बनशेळकी ग्रामपंचायतच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने पाटील व कवठाळे सन्मानित
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील बनशेळकी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सरपंच विकास शेळके यांच्या पुढाकाराने १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मदन पाटील व अंगणवाडी कार्यकर्ती आशा विठ्ठलराव कवठाळे (खेडे) यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुक्ती संग्राम दिनानिमित्त शिक्षकांचा गौरव करणारी तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे . ग्रामपंचायतच्या या कार्याचे शैक्षणिक क्षेत्रात कौतुक होत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच विकास (नरसिंग) शेळके हे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच विवेक महाजन, सोसायटीचे चेअरमन प्रल्हाद महाजन, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी भंडे, पत्रकार मनोहर लोहारे, सय्यद बबर ,गा.प.सदयस सुल्याबाई कांबळे, शिवाजी कांबळे, महादेव लोहारे, उमाकांत सुर्यवंशी, अविनाश आवाळे, रोहित कांबळे, अंगणवाडी कार्यकर्ती संगीताताई शेटकार, नंदाताई काळे, आशाताई आवाळे,राम मानकरी ई उपस्थित होते.यावेळीआगंणवाडी येथे नव्याने रुजू झालेल्या दोन मदतनीस अंजली विजय कांबळे व भाग्यश्री अमोल स्वामी यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच विकास शेळके, सत्कारमुर्ती मदन पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मनोहर लोहारे यांनी आभारप्रदर्शन सहशिक्षक पंढरपुरे सर आभार मानले.या कार्यक्रमाला गावातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक वर्ग, उपस्थित होते.