शिवसेना (ठाकरे) गटाच्या तालुका प्रमुखपदी चंद्रकांत टेंगेटोल

शिवसेना (ठाकरे) गटाच्या तालुका प्रमुखपदी चंद्रकांत टेंगेटोल

उदगीर (प्रतिनिधी) : पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या आदेशाने,संपर्कप्रमुख माजी आ. रोहिदास चव्हाण व शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या सूचनेनुसार उदगीर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत टेंगेटोल यांची शिवसेना तालुकाप्रमुख पदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. संपर्कप्रमुख तथा माजी आ. रोहिदास चव्हाण व शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी अहमदपूर बाजार समितीचे संचालक संतोष रोडगे , विधानसभा अध्यक्ष श्रीमंत दादा सोनाळे ,विधानसभा समन्वयक प्रकाश हैबतपुरे, शिवसेना महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख अरुनाताई लेंडाणे, युवासेना जिल्हा समन्वयक शैलेश वडगावे, व्यंकट साबणे, जळकोट नव निर्वाचित तालुकाप्रमुख मुक्तेश्वर येवरे,अनिल ढोबळे, अभंग मोहटे,अमोल गुट्टे,श्रीरंग केंद्रे आदी उपस्थित होते.

अधिक जोमाने घर तिथे शिवसैनिक,वॉर्ड-गाव तिथे शाखा तयार करून तालुक्यात पक्षवाढवणार करणार -चंद्रकांत टेंगेटोल
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या आदेशाने,संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण व शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या सूचनेनुसार उदगीर तालुका प्रमुखपदी निवड केल्याबद्दल पक्षश्रेष्ठींच आभार मानतो.उदगीर तालुक्यात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणार असुन गाव तिथे शाखा स्थापना करून शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

About The Author

error: Content is protected !!