महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवत टाकळगाव नागठाणाकरांनी गाजविला उपोषणाचा सहावा दिवस
अहमदपूर (गोविंद काळे) : सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पाटील यांच्या समर्थनात व सरसकट मराठा समाजास आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आजचा सहावा दिवस होता मराठा जन आक्रोश आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बेमुदत साखळी उपोषण अहमदपूर तालुका समन्वय समितीने सुरू केले असून या उपोषणाचे सुंदर नियोजन केलेले आहे. ग्रामीण भागातील दररोज दोन गावांचा सहभाग या साखळी उपोषणामध्ये आहे. आज टाकळगाव व नागठाणा येथील नागरिकांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवत लोकजागर पोवाडा भारुड गवळण भजन वाघ्या मुरळी यांचे कार्यक्रम गीत आजचा सोमवारचा दिवस गाजवला आज बाजारचा दिवस असल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यक्रमास प्रचंड गर्दी जमली होती आजच्या उपोषणामध्ये टाकळगाव नगरीतील व नागठाणा येथील समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता यामध्ये युवराज घोगरे पाटील ज्ञानेश्वर जाधव गोविंदराव पाटील तुकाराम पाटील शेषरावजी चावरे बालाजी करंडे समीर पठाण कृष्णा भगवानराव घोगरे पाटील वैभव बालाजी करंडे प्रशांत शंकरराव माखणे निवृत्ती सावंत स्टेशन जाधव रामदास जाधव परमेश्वर घोगरे संभाजी मागणे दत्तात्रय घोगरे राजेंद्र जाधव किशन जाधव संतोष जाधव सुधाकर जाधव नरसिंग माकणे लक्ष्मण सूर्यवंशी सूर्यकांत यादव दीपक यादव बालाजी जाधव रामानंद घोगरे समर्थ राजेंद्र जाधव गजेंद्र भुतेकर श्रीकांत जाधव अमोल माकडे हनुमंत जाधव कृष्णा घोगरे राजकुमार कदम गोविंद पाटील सुधीर माकने लक्ष्मण माखणे वैभव माकणे खंडू सावंत गणेश भोसले आदित्य जाधव बंकट जाधव सुरेश समीर पठाण मुक्तार पठाण अरबाज शेख लव बंदे जगन्नाथ मानाजी जाधव आदी नागरिकांची उपस्थिती होती.