मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनास अहमदपूर येथे प्रतिसाद, साखळी उपोषणाचा ७ वा दिवस

मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनास अहमदपूर येथे प्रतिसाद, साखळी उपोषणाचा ७ वा दिवस

अहमदपूर (गोविंद काळे) : मराठा आरक्षणाचा लढा अनेक वर्षापासून सुरु असुन या लढ्याचे नेतृत्व लढवय्या मावळा मनोज जरांगे पाटील यांनी हाती घेत अमरण उपोषणाला सुरुवात केली. 17 दिवसाच्या उपोषणात तब्येत बिघडली असतानाही ठाम असणारे जरांगे यांनी भगिनिंच्या विनंतीला मान देऊन सलाईन लावून घेतले. त्यानंतर 5 मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत गावोगावी साखळी उपोषण करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत अहमदपूर तालुक्यातील सकल मराठा बांधवांनी उपजिल्हाधिकारी अहमदपूर यांना दि. 12 / 9 / 2023 रोजी निवेदन देत छत्रपती शिवाजी महाराज चौक अहमदपूर येथे साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे कळवीले. त्यानुसार दि. 13 पासुन साखळी उपोषणास बसले. दररोज वेगळ्या गावच्या शिलेदारांवर जबाबदारी सोपवण्यात येत आहे. आज रोजी शिरूर ता. येथील मावळ्यांनी महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करून या साखळी उपोषणास सुरुवात केली. यावेळी शिरूर येथील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. यामधे संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक नाना कदम, सकल मराठा समाजाचे शिवानंदजी भोसले,यूवराज भैय्या पाटील, शिवशंकर लांडगे, सिद्धेश्वर औवरादे,धिरज भंडे पाटील, मुकेश पाटील, ज्ञानोबा भोसले, किशन कापसे, सत्यवान भोसले . बालाजी पडोळे,ज्ञानोबा वाढवणकर,दत्तात्र्य जवळगे, उद्धव भोसले ,संतोष महापुरे गणेश कापसे, बालाजी पडोळे, जयवंत सगर, राजकूमार चव्हाण,गजानन तेलघाने ,असिफ किनीवाले,कोंडवाडे दत्तात्रय, माधव जवळगे, ओमप्रकाश भोसले,माने चैतन्य सदानंद मुंगळे, विनोद ढेपे, प्रविण यादव, शिवपाल भोसले,गणेश भोसले, माने गणेश, बबन मोरे,विक्रम भोसलेआदी उपस्थित होते.

About The Author