स्मशानभूमी व कबालनाम्याच्या प्रश्नांसाठी तहसिलवर धडकला भव्य मोर्चा
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील 49 ठिकाणी सार्वजनिक स्मशानभूमी मंजूर करावी आणी 86 ठिकाणी दलित समाजाच्या स्मशानभूमी मंजूर करावे यासाठी तसेच घरकूलांच्या मंजूरी साठी कबालनाम्याचे वाटप करावे आदी प्रमुख मागण्या घेऊन सम्राट मित्र मंडळाच्या वतीने युवकनेते डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हजारों नागरीकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. येथील नगरपरिषदेच्या प्रांगणावरून हा मोर्चा निघाला.मोर्चात अहमदपूर तालुक्यातील विविध गावातून आलेला मोठा जनसमुदाय मोर्चात सहभागी झाला होता. प्रामुख्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरून आंबेजोगाई रोड गौतम वाघमारे चौक समोरून भिम नगर ते आझाद चौक शिवाजी महाराज चौक येथून हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.या मोर्चा प्रसंगी माजी आमदार बब्रूवानजी खंदाडे,भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील,माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे, गफारखान पठाण,महेंद्र ससाणे,अँड.सुभाषराव सोनकांबळे,रमेश कांबळे,भगवान ससाणे, सांगवीचे सरपंच राजू कांबळे,थोडग्याचे सरपंच शरद मूंडे,शरद बनसोडे,गूंजोटीचे सरपंच राम चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. अहमदपूर तालूक्यातील 49 गावामध्ये तातडीने सार्वजनिक स्मशानभूमी मंजूर करावी,87 गावातील दलित समाजाच्या स्मशानभूमी मंजूर करावी,अहमदपूर स.नं.4 चे कबालनामे तातडीने द्यावे,घरकूलासाठी शासनाच्या वतीने अनुदानात वाढ करावी,उपजीविकेसाठी अतिक्रमण केलेले गायरानाचे पट्टे शेतमजूरांच्या नावे करावेत,अतिक्रमणाची नोंद ई-रजिस्टर ला करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसिलदार आणी गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. या मोर्चाला तालुक्यातून युवक,महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रशांत जाभाडे,आकाश सांगवीकर,अजय भालेराव,भिमराव कांबळे,सचिन बानाटे, प्रदिप सांगवीकर, तबरेज सय्यद,मोहम्मद पठाण, नौशाद सय्यद दिलीप भालेराव,सूधीर जोंधळे, संगमेश्वर बनसोडे, अनिल तिगोटे, संविधान कदम, राजू मतकर,रवी बनसोडे, दिनेश तिगोटे, प्रकाश लांडगे, आकाश पवार आदींनी पूढाकार घेतला.