हैदराबादच्या मुक्तिसंग्रामात लातूर जिल्ह्यातील सैनिकांचे मोठे योगदान – माजी मंत्री बाळासाहेब जाधव

हैदराबादच्या मुक्तिसंग्रामात लातूर जिल्ह्यातील सैनिकांचे मोठे योगदान - माजी मंत्री बाळासाहेब जाधव

अहमदपूर (गोविंद काळे) : हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या वेळी निजामाच्या अन्याय अत्याचाराला मराठवाड्यातील जनता पूर्ती कंटाळली होती. त्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्राप, विजेंद्र काबरा यांच्यासह लातूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे हैदराबादच्या मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात मोठे योगदान असल्याचे आग्रही प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले. ते दि. 17 रोजी लातूर नांदेड रोडवरील रेड्डी पेट्रोल पंपा लगत चौकाला स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीराव रेड्डी चौकाच्या अनावरण फलकाच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून एडवोकेट भगवानराव पौळ, प्रमुख अतिथी म्हणून माझी मंत्री विनायकराव पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, माजी आमदार बब्रुवाहन व खंदाडे, उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, रिपाईचे राज्य सचिव बाबासाहेब कांबळे, टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ अशोक सांगवीकर, माझी जि प सदस्य माधव जाधव, बाजार समितीचे माजी सभापती एडवोकेट भारत चामे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केंद्रे, माजी नगराध्यक्ष सरस्वतीताई कांबळे, भारत दादा रेड्डी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले की, मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाच्या लढ्यात स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीराव रेड्डी यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगून त्यांचा आदर्श समाजातील तरुणांनी घ्यावा असे सांगितले. यावेळी डॉ. अशोक सांगवीकर, दिलीपराव देशमुख, बब्रुवाहन खंदाडे, गणेश दादा हाके यांचे स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीराव रेड्डी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी मार्गदर्शनपर भाषण झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भूषणकुमार जोरगुलवार यांनी सूत्रसंचालन शासनाचा महात्मा बसेश्वर पुरस्कार विजेते राम तत्तापुरे यांनी तर आभार एडवोकेट अमित रेड्डी यांनी मानले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ आणि स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीराव रेड्डी यांच्या प्रतिमेचे पूजन करून चौकाच्या फलकाचे अनावरण एडवोकेट भगवानराव यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी या सोहळ्याला डॉ. अशोक आरदवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर गणेश कदम, बाजार समितीचे संचालक संतोष रोडगे, शिवाजीराव खांडेकर, एडवोकेट हेमंत पाटील, माजी नगरसेवक बाळासाहेब आगलावे पाटील, रवी महाजन, देवेंद्र देवणीकर, बाबासाहेब देशमुख, भारत सांगवीकर, माजी सभापती राजू खंदाडे, प्रशांत घाटोळ, पापा आय्या, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. वैभव रेड्डी, सरपंच प्रवीण रेड्डी, संजय रेड्डी राकेश रेड्डी राजू रेड्डी, उमेश रेड्डी, धनंजय तोकले, यांच्यासह मित्र परिवारांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author