राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत किलबिलचे यश
अहमदपूर (गोविंद काळे) : दि.13 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र परीक्षा परिषद (MSCE) पुणे यांच्याकडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा प्रथम स्तर या परीक्षेत किलबिल नॅशनल स्कुल शाळेतील कु प्रगती देविदास पोगुलवाड व चि सुयोग शिवदास रोडगे हे दोन विद्यार्थी NCERT यांच्याकडून राष्ट्रीय पातळीवरील घेतल्या जाणाऱ्या स्तर दुसरा यासाठी महाराष्ट्राच्या गुणवत्ता यादीत अनुक्रमे 39 व 46 रँक घेऊन यश संपादित केले आहे. त्यांना शाळेचे सहशिक्षक परवेज शेख, गोविंद चामे, लक्ष्मण थोटे, राजेंद्र परगे,प्रकाश कांबळे, आदींनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, मुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक महावीर गोडभरले आदींनी अभिनंदन करून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.