रुद्र महिला मंडळा तर्फे लिंगायत स्मशान भूमीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम

रुद्र महिला मंडळा तर्फे लिंगायत स्मशान भूमीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील रुद्र महिला मंडळा च्या वतीने लिंगायत (विरशैव) स्मशान भूमी, अहमदपूर येथे सुशोभित करण्यासाठी तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी व तेथील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी, त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तेथे बेल, शमिपत्र, करंजी यासारखी भरपूर थंड सावली देणारी वृक्षाची लागवड करण्यात आली. ही वृक्ष मोठी होईपर्यंत त्याची जोपासना करण्याचेही ठरले. या प्रसंगी रुद्र महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमंती विजयाताई चवंडा, उपाध्यक्षा विजयाताई हामणे, सचिव सौ. शोभा शेटकार, कोषाध्यक्ष श्रीमती शांताबाई गिराम व मंडळाचे सर्व सदस्या उपस्थित होत्या.

About The Author

error: Content is protected !!