महात्मा फुले महाविद्यालयाचे क्रीडा प्रकारात दुहेरी यश
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत ‘ब’ झोन मध्ये घेण्यात आलेल्या हातोडा फेक व भालाफेक या मैदानी खेळात अनुक्रमे सिल्वर व ब्रांच पदक मिळवून विद्यापीठ स्तरावर क्रीडा क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व स्वामी विवेकानंद महाविद्यालय शिरूर ताजबंद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ब ‘ झोन विभागीय मैदानी स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.अश्विनी गिरी ने हातोडा फेक स्पर्धेत सिल्वर मेडल तर ; भालाफेक मध्ये कॉन्स मेडल प्राप्त करून महाविद्यालयाचा लौकिक वाढविला आहे. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी विद्यार्थिनीचा सत्कार करून अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, यशस्वी विद्यार्थिनी कु.अश्विनी गिरी ने क्रीडा संचालक प्रोफेसर डॉ. अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्रीडा प्रकारात यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थिनी व मार्गदर्शकाचे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.