लढा मराठ्यांच्या ओबीसी करणाचा! नवव्या दिवशी शिंदगी करांचे उपोषण

लढा मराठ्यांच्या ओबीसी करणाचा! नवव्या दिवशी शिंदगी करांचे उपोषण

अहमदपूर (गोविंद काळे) : सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने श्री मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठवाडा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आजचा नववा दिवस अहमदपूर तालुक्यातील मौजे शिंदगी येथील नागरिकांची उपस्थिती चनाक्रोश आंदोलनाचे प्रणेते श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिनांक 13 सप्टेंबर पासून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साखळी उपोषण सुरू असून या उपोषणाचे समन्वयक समितीच्या वतीने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने नियोजन केले आहे यामध्ये ग्रामीण भागातील प्रत्येकी दोन गावांचा सहभाग या उपोषणामध्ये असणार असून अत्यंत शांततेच्या मार्गाने संविधानात्मकरित्या आंदोलन सुरू असून आंदोलन स्थळी ग्रामीण भागातील समाज बांधव वेगवेगळ्या कार्यक्रमातून आरक्षणाची गरज पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवत पोवाडा भारुड गवळण वाघ्या मुरळी असे विविध कार्यक्रम सादर करत जनजागृती करत आहेत. आज पर्यंत या आंदोलनामध्ये बेलूर सलगरा शिरूर ताजबंद सोरा चिलखा अंधोरी ढाळेगाव नागठाणा टाकळगाव सिंदगी येथील सकल समाज बांधवांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला तसेच शहरातील वकील संघ डॉक्टर संघ शिक्षक संघ व्यापारी संघ महाविद्यालयीन युवक युवती यांनी सहभाग घेतला आहे. फक्त साखळी उपोषवरच न थांबता टप्प्याटप्प्याने असहकार आंदोलन शासकीय कामांचा निषेध पुढाऱ्यांना गावबंदी अशी भूमिका घेतली जाणार असून तदनंतर ग्रामीण भागात गावोगावी साखळी उपोषण केले जाणार आहे सरकारला दिलेली 40 दिवसाची मुदत व त्यानंतर आंदोलनाचे प्रणेते श्री मनोज जरांगे पाटील यांच्या निर्देशनानुसार आंदोलनाची पुढील दिशा असेल असे समन्वय समितीच्या सदस्यांच्या वतीने सांगण्यात आले.

About The Author