उजना डेअरीला पु. अहिल्यादेवीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिली क्षेत्र भेट

उजना डेअरीला पु. अहिल्यादेवीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिली क्षेत्र भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी सु येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सांगवी येथील उजना डेअरीला नुकतीच भेट देऊन तेथील प्रत्येक बाबींविषयी माहिती घेतली.इयत्ता दहावीच्या भुगोलच्या पाठ्यपुस्तकात क्षेत्र भेट नावाचे पहिलेच प्रकरण असून क्षेत्रभेटीच्या अहवालासाठी प्रत्यक्ष अनुभव घेता यावा म्हणून विषय शिक्षक श्री अमोल सारोळे यांच्या संकल्पनेतून सांगवीच्या उजना डेअरीला नुकतीच भेट देण्यात आली.याप्रसंगी वर्गशिक्षक शेख जिलानी हेही सोबत होते.याप्रसंगी डेअरीच्या अधिका-यांनी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना यथावकाश माहिती दिली.

About The Author

error: Content is protected !!