महिलांना आता ३३% राजकीय आरक्षण
अहमदपूर (गोविंद काळे) : भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांनी देशातील समस्त नारीशक्तीचा सन्मान म्हणून देशाची लोकसभा व सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलासांठी ३३% जागा आरक्षित करणारे क्रांतीकारी विधेयक आणल्याबद्दल भाजपा महिला आघाडीतर्फे श्रीमती रेखाताई हाके, प्रदेश सरचिटणीस महिला मोर्चा महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ढोल-ताशाच्या गजरात मोठा जल्लोश करुन पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला,या निर्णयाचे स्वागत करत मा. मोदीजींचे आभार मानन्यात आले. जनसामान्य महिलांच्या भावना या निर्णयाद्वारे प्रकट झाल्या असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. या धाडसी निर्णयाबद्दल सर्व स्तरातून स्वागत होताना दिसतो.एकविसाव्या शतकात एक नवीन भारत घडवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल म्हणण्यात येत आहे याप्रसंगी अश्विनीताई कासनाळे,कलावती भातांब्रे,आबंदे संगीता , मीना तोर ,रेखा बलुरे ,वंदना केंद्रे, प्रणिता बेंबडे ,बालिका चोरमले, नळगिरे ताई, जाधव ताई ,पुष्पा पाटील इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.