विजेच्या बाबतीत लातूर स्वयंपूर्णतेच्या मार्गावर
लातुर (प्रतिनिधी) : शहर आता विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, यासाठी चा पहिला टप्पा पार देखील केला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याचे प्रस्तावित होते. त्या अनुषंगाने हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र परिसरात 900 किलोवँट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीच्या कामाचे पालक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, नगरसेवक अशोक गोविंदपूरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.