महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार महिला मेळावा – प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांचे प्रतिपादन
लातूर (प्रतिनिधी) : लायनेस क्लबच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यांना छोट्या उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम केले जात आहे. या उपक्रमाला महिलांतून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भविष्यात गरजू महिलांना उद्योगासाठी आर्थिक मदत व बँकेकडून कर्ज मंजूर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन लायनेसच्या उपप्रांतपाल तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी त्या लातूर तालुुक्यातील कव्हा येथे आयोजित लायनेस क्लब, सावित्री लायनेस क्लल, जेएसपीएम महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमााने आयोजित महिला मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी स्वामी दयानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अरूणा कांदे या अध्यक्षस्थानी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून कुंभारे, संगिता कवरे, प्रमोद सर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रतिभाताई पाटील कव्हेकर म्हणाल्या महिलांनी लघु उद्योगाच्या माध्यमातून सक्षम बनावं उद्योगामध्ये परसबाग, सेंद्रिय शेती करून भाजीपाला तयार करणे, मशरूम, लोणचे, चटण्या, मसाले पापड असे उद्योग उभे करून आपला आणि आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह चांगल्या पध्दतीने करावा या छोट्या उद्योगाासाठी आर्थिक मदत किंवा बँकेकडून कर्जही उपलब्ध करून देवू असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले. कार्यक्रमाच्या प्रारंभ मानदेशी फाऊंडेशनच्यावतीने आलेल्या प्रतिनिधींनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी कव्हा गाव परिसरातील महिलांचे या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.