यशवंत विद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

यशवंत विद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. यावेळी दोन्हीही प्रतिमांच्या फोटोला प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री गजानन शिंदे म्हणाले की, तरुणांनी थोरांचे विचार आत्मसात करून आपले जीवन घडवावे असे जाहीर आवाहन केले. या जयंतीच्या निमित्ताने भाषण, निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्वेक्षक अशोक पेदेवाड, राम तत्तापूरे, संतोष कदम, बालाजी सोनटक्के, बालाजी माळी, राजकुमार बोराळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम तत्तापूरे यांनी सूत्रसंचलन सुनील स्वामी यांनी तर आभार सचिन धंनजय तोकले यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!