यशवंत विद्यालयाचे बास्केटबॉल च्या क्रीडा स्पर्धेत तिहेरी यश विभागीय स्तरावर दाखल
अहमदपूर (गोविंद काळे) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 01ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेत अहमदपूरच्या यशवंत विद्यालयाने 14 वर्षे मुलींच्या गटात सर्व प्रथम क्रमांक, 17 वर्षे मुलींच्या गटात प्रथम क्रमांक व 17 वर्षे मुलांच्या गटात प्रथम क्रमांक पटकाविलाअसुन या तिन्ही संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. यात 14 वर्षे मुलींमध्ये सिद्धी शेटकार,अंतरा शेटकार, धनश्री शिंदे , अक्षरा चलवाड, सायली ढाकणे, प्रतीक्षा चावरे, मैथिली पाटील, स्वरा देशमुख -17 वर्षे मुलींच्या संघामध्ये समीक्षा कुमरे , प्रणिशा फाजगे, अमृता उगिले, अक्षरा आरदवाड, श्रीजेल केंद्रे, प्रेरणा कदम, ऋतुजा तुडमे, पूर्वी जटाळ, अदिती भिकाने ,स्मिता कोत्तावार, – 17 वर्षे मुलांच्या संघामध्ये मयुरेश मद्रे,गणेश गुणाले, अनुज जोगदंड, अनुप पुणे, जाबीर पठाण, श्रीतेज शेटकर, ईश्वर कोणाले, ओम मद्रेवार,अक्रम बिरादार यांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे.
या विद्यार्थ्यांना प्रा.डॉ. मनोज रेड्डी, प्रा. शरद माने, क्रीडा विभाग प्रमुख संतोष कदम, दीपक हिंगणे, प्रतिभा मिरजकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या नेत्रदीपक यशा बद्दल क्रीडापटूंचे व मार्गदर्शकांचे टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी.बी.लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक गजानन शिंदे, उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे, परवेक्षक अशोक पेदेवाड, राम तत्तापुरे, सोमनाथ स्वामी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.