गांधी जयंती निमित्त वृक्षारोपण
उदगीर (एल.पी.उगीले) : महात्मा गांधी जयंती निमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपालिका कॉर्नर पर्यंत क्रीडामंत्री संजयजी बनसोडे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भरतभाऊ चामले यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपालिका कॉर्नर पर्यंतच्या डिव्हायडरच्या आत चाफा व आपटा या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी ना. संजयजी बनसोडे यांनी भरतभाऊ चामले यांचे कौतुक करत शहर पोलीस स्टेशनचे कदम यांना उदगीर शहरातील समाजसेवी संघटनांकडून असेच वृक्षारोपण करून घ्यावे. व उदगीरच्या सौंदर्यात भर टाकावी, असे सूचक वक्तव्य केले. यावेळी उदगीरचे तहसीलदार रामेश्वरजी गोरे, स्वातंत्र्य सेनानी तुकाराम चामले, रमेशअण्णा अंबरखाने, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, व्हि.एस. कुलकर्णी, धर्मपाल नादरगे, बाबासाहेब काळे पाटील,भालचंद्र घोणसिकर, नागनाथ बंडे, बाबुराव अंबेगावे, बाळासाहेब नवाडे, बालाजी परगे, जितेंद्र शिंदे, रंजीत कांबळे, विजय येडले, युवराज कांडगिरे, शुभम पाटील, अविनाश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.