महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

उदगीर (एल. पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. दिनविशेष समिती, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयातील सेवानिवृत्त उपप्राचार्य गंगाधर हिंगोले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी होते. मंचावर सचिव रामचंद्र तिरुके, सदस्य प्रा.मनोहर पटवारी, बसवराज पाटील मलकापूरकर, शिवराज वल्लापुरे, प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील, उपप्राचार्य एस.जी.कोडचे, प्रा.पी.पी.पदातुरे, शिवाजी भोळे यांची उपस्थिती होती. महात्मा गांधीजींच्या विचाराची प्रासंगिकता हा व्याख्यानाचा विषय होता. यावेळी प्रा.हिंगोले म्हणाले महात्मा गांधी मुळे देशाची ओळख जगात आहे. महात्मा गांधीजीचे व्यक्तीमत्व सर्व स्पर्शी व सर्वमान्य असून महात्मा गांधीजींनी मांडलेले विचार आजही प्रासंगिक असून महात्मा गांधीजींच्या विचारापासून प्रेरणा घेऊन अनेकांना काम करावे वाटते हेच गांधीजींच्या विचारांचे वेगळेपण आहे. यावेळी श्री.मानकरी म्हणाले जगाच्या कल्याणासाठी महात्मा गांधीजींनी कार्य करून सत्य व अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य दिले. यावेळी प्रा.पटवारी म्हणाले महापुरुषांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपले जीवन घडविले पाहिजे. यावेळी तिरुके म्हणाले महामानवांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या प्रेरणेने देश घडवूया अशी अपेक्षा व्यक्त करून उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. प्रास्ताविक डॉ. आर. के. मस्के यांनी केले सूत्रसंचालन प्रा.डॉ.जी.जी.जेवळीकर यांनी केले तर आभार प्रा.डॉ.बी.एस.होकरणे यांनी मानले. सकाळच्या सत्रामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.बी.एस.होकरणे ,प्रा.डॉ.बंकट कांबळे, प्रा.डॉ.सुनंदा भद्रशेटे, लेफ्टनंट मेजर प्रा.डॉ.आर.पी.साबदे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालय परिसर स्वच्छतेसाठी योगदान दिले.

About The Author