नांदगाव येथे गरजूंना किराणा व गृहउपयोगी साहित्याचे वाटप
रोहित पाटील मित्र मंडळ व अभिनव भारत प्रतिष्ठान यांच्या प्रयत्नातून गुंज ची सामाजिक बांधिलकी
लातूर (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार होऊ नये, यासाठी लातूर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे अनेक गोर गरीबांचे कामधंदे बंद पडल्याने व रोजगार हिरावल्यामुळे नागरिकांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. ही बाब ओळखून नांदगाव येथील रोहित पाटील मित्र मंडळ व अभिनव भारत प्रतिष्ठान यांच्या अथक प्रयत्नातून गुंज सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत नांदगाव येथील २१ गरजू कुटुंबांना किराणा व गृहउपयोगी साहित्याचे वाटप करत आधार देण्याचे काम केले आहे.
या प्रसंगी लातूर एन एस यु आय चे शहरजिल्हाध्यक्ष रोहित पाटील, नांदगाव चे माजी सरपंच बापूराव साळुंके, मेहबूब पठाण, चेअरमन सतीश कुलकर्णी, सुधाकर पाटील, कैलास जगताप, प्रदीप गर्जे, काकासाहेब पाटील, प्रदीप कोटीवाले, बापूराव पाटील, व्यंकट घोडके, छोटुमिया शेख, त्र्यंबक पाटील, सुधाकर ढमाले, पवन साळुंके, श्रीपाल वाघमारे, बजरंग साळुंके, विश्वनाथ पाटील, हरिदास पाटील, प्रसाद पाटील, धीरज पाटील, सैफ शेख व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.