माहेश्वरी समाज हा देशाच्या विकासासाठी वरदान आहे – राज्यमंत्री संजय बनसोडे

माहेश्वरी समाज हा देशाच्या विकासासाठी वरदान आहे - राज्यमंत्री संजय बनसोडे

उदगीर (प्रतिनिधी) : माहेश्वरी समाज उत्पत्ति दिन महेश नवमी निमित्त  उदगीर तालुका माहेश्वरी सभा आणि मारवाडी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कोरोना वैक्सीन शिबिर व महेश पूजन कार्यक्रमात  देशाच्या प्रगतीसाठी माहेश्वरी समाज एक वरदान असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले. उदगीर तालुका माहेश्वरी सभा व मारवाडी युवा मंच उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी नारायण मंदिर येथे महेश नवमी निमित्त  महेश पूजन तथा कोरोना वैक्सीन शिबिराचे उद्घाटन 19 जून शनिवार रोजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते  करण्यात आले.

  यावेळी तासिलदार रामेश्वर गोरे, नपाचे मुख्य अधिकारी भारत राठोड, गट विकास अधिकारी महेश सुळे, माहेश्वरी सभा जिल्हा  सदस्य ईश्वरप्रसाद बाहेती, उदगीर सभा अध्यक्ष विनोदकुमार टवानी, सचिव श्रीनिवास सोनी, मार्गदर्शक डॉ. रामप्रसाद लखोटिया, डॉ. रामेश्वर बाहेती, अमोल बाहेती, गोपाल मणियार, चंदन अटल, अतिश बियाणी, अमोल राठी, शिरीष नवांदर, कैलास मालू, डॉ प्रवीण मुंदडा, सत्यनारायण सोमानी, गणेश बजाज, कोमल मालपाणी युवा मंचचे अध्यक्ष लक्ष्मीकांत सोमानी, सचिव गोविंदा सोनी , सुरेश तिवारी, पवन मुंदडा, संजयकुमार सोनी, आनंद बजाज, संजय नावंदर, रामबिलास नावंदर, द्वारकादास भूतड़ा, विष्णुदास लोयाआणि राजकुमार नावंदर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, देशाला माहेश्वरी समाजातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळते, हा समाज देशाच्या विकासासाठी  वरदान आहे, या समाजाला एक आदर्श समाज म्हणून पाहिले जाते, आज उत्पत्ति दिनी   मी समाजाला आणखी प्रगतीची इच्छा करतो, आज समाजासाठी घेतलेली लसीकरण शिबिर हे कोरोना काळात   कौतुकास्पद पाऊल आहे , यावेळी समाजातील महिला व पुरुष उपस्थित होते,उपजिल्हा रुग्णालयाचे  अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ शशिकांत   देशपांडे, नोडल अधिकारी डॉ सी.एस. रामशेट्टे, शुभांगी अंकुलगे, रामकिशन भोसले, सुलोचना जाधव, विनोदकुमार स्वामी यानी अथक परिश्रम घेऊन वैक्सीन शिबिर सम्पन्न केले.

About The Author