मनसेने कोरोना महामारी च्या काळात रक्त तुटवडा लक्षात घेऊन घेतले रक्तदान शिबिर
उदगीर (प्रतिनिधी) : राज ठाकरे यांनी माझ्या वाढदिवसाला मला भेटायला मुंबईला येण्यापेक्षा समाज उपयोगी कामे करा. या दिलेल्या आदेशाचे पालन करत, उदगीर मनसेतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. कोरोना महामारी च्या काळात प्रचंड प्रमाणावर रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्ताविना गंभीर रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आल्या मुळे आपली सामाजिक बांधिलकी जपत उदगीर मनसेने या काळात रक्तदान शिबिर घेऊन राज ठाकरे यांचा
53 वा वाढदिवस साजरा केला. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा संपूर्ण महिना विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस उदगीर मनसेने केला असून त्यानुसार रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व संगोपन मोहीम, गोरगरीब लोकांना अन्नधान्याची मदत. असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंबरखाने ब्लड बँकेचे डॉक्टर शेटकार, स्वामी सर इत्यादी उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष संग्राम रोडगे, शहराध्यक्ष अभय सूर्यवंशी, शहर सचिव अमोल गाजरे, शहर उपाध्यक्ष संतोष भोपळे, लखन पुरी कामगार सेना तालुका अध्यक्ष दयानंद डोंगरे, विभाग अध्यक्ष गजानन तळभोगे, शिवाजी देवकते, रामदास तेलंगे, संतोष लातूरकर, मारुती विभुते, अर्जुन जंपवाड,राजु भोपळे, राहुल नागुरे,चंद्रकांत कांबळे,नामदेव राठोड आदींनी परिश्रम घेतले.