प्रभुराज प्रतिष्ठाण च्या वतीने लातूर परिसरात लसीकरण जनजागृती
लातूर (प्रतिनिधी) : रोजी प्रभुराज प्रतिष्ठाण, लातूर च्या वतीने खाडगाव रोड, संभाजी नगर, दयानंद गेट, सिग्नल लातूर व जिल्हा न्यायालय परिसरात न्यायालयात येणारे पक्षकार व नागतिकांना प्रतिकात्मक यमाच्या वेशभूषेत लसीकरण जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी लसीकरण च्या मोहिमेत सहभाग घेऊन लस घ्यावी व इतरांना ही जागृत करून सर्वानी लस घेऊन आपले व इतरांचे आरोग्य जपावे लसीकरण घेणे ही काळजी गरज आहे कोरोना पासून बचाव करण्यासाठी लसीकरण करून घेणे ही महत्वाचे घटक आहे याने आपले व आपल्या परिवाराचे आरोग्य सुरक्षित राहील या करिता प्रशासन नागरिकांना आव्हान करीत आहेत तरी प्रत्येक नागरिकांनी लस घेऊन कोरोना मुक्त भारताच्या दिशेने सहकार्य करावे असे यामाकडून नागरिकांना जनजागृती चे पत्रक वाटप करून निष्काळजी पणा करू नका….मृत्यूस आमंत्रण देऊ नका….लसीकरण मोहिमेत सहभाग घेऊया…कोरोना हद्दपार करूया…लस घेऊया….कोरोनाला हरूया….असे हातात बोलके फलक घेऊन जनजागृतीचा उपक्रम घेण्यात आला. तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने शासनाने राबविलेल्या लसीकरण उपक्रमत सहभाग नोंदवून लस घ्यावी व इतरांनाही लस घेण्यास सांगावे असे आव्हान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी केले. यावेळी जिल्हा न्यायालय १ ए. व्ही.गुजराथी, दिवाणी स्तर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रभारी सचिव तथा न्यायाधीश एन. आर. तळेकर, प्रभुराज प्रतिष्ठाणचे ॲड. अजय कलशेट्टी, ॲड. सुरेश सलगरे, ॲड. कल्पना भुरे, ॲड. किरण चिंते, महेश पाटील, नितीन ढमाले, कैलास गरूडकर, गजानन पांचाळ, महादेव दिवे, सचिन भोसले, सदानंद दिवे, महादेव रासे, बंटी राऊत, यमराज वेशभूषत गणेश काकडे आदी उपस्थित होते.