औरादमध्ये खते व बियाण्यांची भेदभाव करुन विक्री
साठेबाजीमुळे टंचाई करीत असल्याची शेतकऱ्यांमधुन होत चर्चा
औराद शहाजानी (भगवान जाधव) : सध्या खरीप हंगामाच्या पेरणी सुरु आहेत आणी महाबिज बियाणे हे सबसीडीच्या माध्यमातून विक्री होत असल्याने या बियाण्यांची सध्या जास्त मागणी आहे व डिएपी व २०-२०-०-१३ या खतांच्या मागणीवर सध्या शेतकऱ्यांचा जोर आसल्यामुळे दुकानदार हे खते व बियाणांची साठेबाजी करुन आपल्या हितातील किंवा जवळच्या नातेवाईकांना पाहुन खते व बियाण्यांची विक्री करीत आहेत.
कोरोनामुळे दोन महिन्यांपासुन व्यापार बंद होते आणी त्यातच व्यापाऱ्यांनी खते व बियाण्यांची मागणी करुनही पुरेसे खते , बियाणे कंपन्यांकडुन उपलब्ध झाले नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी आहे त्या खते व बियाण्यांची साठवणुक करुन दैनंदिनी खते व बियाण्यांची विक्री ही बोर्डावर लिहुण दुकानांच्या दर्शनी भागात लावायचे असतानाही ते फलक एक एक आठवडा लिखान करीत नाहीत त्यामुळे दुकानदारांकडे कोणकोणत्या खते व बियाण्यांची उपलब्धता आहे हे कळले असते पण तसे न झाल्यामुळे शेतकऱ्यांना खते व बियाण्यांच्या खरेदीसाठी कसरत तर करावीच लागत आहे याशिवाय दुकान मालकांच्या जवळचे नातेवाईक व मित्रसंबंधितांची ओळख घेऊन खरेदी करावी लागत आसल्याचे चित्र दिसत आहे.