श्री रामनाथ विद्यालयाच्या मियावाकी वृक्ष लागवडीस जिल्हाधिकारी व जि.प CEO साहेबांची भेट

श्री रामनाथ विद्यालयाच्या मियावाकी वृक्ष लागवडीस जिल्हाधिकारी व जि.प CEO साहेबांची भेट

औसा : आलमला येथे दि. १९ जून २०२१ रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी , लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी रामनाथ विद्यालयातील दोन वर्षांपूर्वी लावलेल्या मियावाकी वृक्षलागवडीची पाहणी केली. त्यांच्या शुभहस्ते रामनाथ विद्यालयाच्या नवीन मैदानात वृक्षारोपण करण्यात आले. रामनाथ शिक्षण संस्थेत प्रथमच आल्यामुळे त्यांचे रामनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. उमेश शिवाप्पा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच CEO साहेबांचा सत्कार संस्थेचे सहसचिव प्रभाकर कापसे यांच्या हस्ते करण्यात आला. दोन्ही मान्यवरांनी संस्थेला आणखीन वृक्ष लावण्याचा आवाहन केले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे साहेब, तहसीलदार शोभा पुजारी, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, पंचायत समिती सभापती अर्चना गायकवाड, आलमला सोसायटी चेअरमन विश्वनाथ बिराजदार, सरपंच कैलास निलंगेकर, उपसरपंच खंडेराव कोकाटे,आलमला तलाठी भागवत सोनवणे,  विश्वेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव बसवेश्वर धारशिवे, प्राचार्या सौ. अनिता पाटील, ग्रामपंचायत सदस्य गुरूनाथ आंबुलगे, बाबूसिंग ठाकूर, सोमनाथ आंबुलगे, कैलास कापसे, ॲड. संगमेश्वर पाटील, ॲड. कमलेश निलंगेकर, विद्यालयायील सर्व कर्मचारी वृन्द होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पी सी पाटील यांनी केले.

About The Author