अहमदपूरच्या सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुभाष गुंडिले तर सचिव पदी साईनाथ पाटील यांची निवड

अहमदपूरच्या सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुभाष गुंडिले तर सचिव पदी साईनाथ पाटील यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील दसरा प्रेमी नागरिकांची व्यापक बैठक दि. 06/१०/२०२३ रोजी शासकीय विश्राम ग्रहात दसरा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अशोकराव सांगवीकर यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक होऊन 2023 च्या सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुभाष गुंडिले यांची तर सचिव पदी साईनाथ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. उर्वरित कार्यकारणी खालील प्रमाणे. उपाध्यक्ष संगम पाटील, शिवा कासले, सहसचिव राजकुमार पुणे, कोषाध्यक्ष अनिकेत काशीकर, सदस्य सुरेश डबीर, अभिजीत पाटील, सौरभ कुलकर्णी, जयराज तेलंग यांची तर सजावट प्रमुख नितीन धर्माधिकारी, मुन्ना आया, गोविंद हिवरे, तुकाराम लोकरे, पप्पू हिवरे, नागेश वाडकर, संतोष सोलपुरे यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीला मार्गदर्शक ओम भाऊ पुणे, माधव पुणे, पापा आय्या, राम तत्तापुरे,गोविंद गिरी, प्रा. विश्वंभर स्वामी, दादा उटगे, विकास महाजन, दयानंद पाटील, डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, शैलेश जाधव, दत्ता गोरे, पप्पू येवंदगे, राजकुमार गाढवे, राम पाटील, रमेश कल्याणे, गणेश कोदळे, योगेश शेटकर, वैजनाथ चौधरी, शिवाजी गायकवाड, संतोष निटुरे, पिंटू सूर्यवंशी यांच्यासह दसरा प्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी नूतन कार्यकारणीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गेल्या वर्षीचे अहवाल वाचन माजी अध्यक्ष राम पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन दादा उटगे यांनी तर आभार गोविंद गिरी यांनी मांनले.

About The Author

error: Content is protected !!