पानगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सर्वांगीन विकासाठी पाच कोटी निधी मिळवून देऊ – आ. कराड
लातूर (प्रतिनिधी) : प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या पानगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराची हेमाडपंथी वास्तू पुन्हा निर्माण होणे नाही. त्यामुळे ही वास्तू जतन केली पाहिजे या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा मिळवून देवू त्याचबरोबर भावीक भक्तांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी दिली.
आ. रमेशआप्पा कराड यांनी बुधवारी सायंकाळी पानगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास भेट दिली मनोभावे पूजा करून आरती केली. मंदिर परिसरात होणाऱ्या ५० लक्ष रुपयांच्या कामाची माहिती घेऊन पाहणी केली. यावेळी भाजपाचे विक्रमकाका शिंदे, लातूर ग्रामीण अध्यक्ष अनिल भिसे, तालुकाध्यक्ष अँड दशरथ सरवदे, रेणापुर तालुका संगायो अध्यक्ष वसंत करमुडे, जिल्हा भाजपाचे सतीश आंबेकर यांच्यासह पानगाव येथील मंदिर ट्रस्टचे प्रदीप कुलकर्णी, माजी उपसभापती अनंत चव्हाण, माजी सभापती चंद्रचूड चव्हाण, माजी जिप सदस्य ईश्वर गुडे, सुकेश भंडारे, बांधकाम विभागाचे देवशेटवार यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
पानगावच्या या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आल्यावर प्रसन्नता आणि अनुभूती मिळते. अंदाजे १३ व्या शतकातील हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील मंदिराचे जतन झाले पाहीजे. अशा वास्तू पुन्हा निर्माण होणे अशक्य असून मंदिराचा पुनर्विकास झाला पाहीजे, भाविकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की या मंदिराला पर्यटन विकासाचा ‘ब’ दर्जा मिळून सर्वांगीण विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळवून देऊ अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर पानगावकरांनी एकोपा कायम ठेवून गावचा विकास करून घ्यावा असे बोलून दाखविले.
प्रारंभी आ. कराड यांचे मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रदीप कुलकर्णी यांनी फेटा बांधून मानाचे उपरणे व पुष्पहार घालून स्वागत केले, त्याचबरोबर दत्ता कस्तुरे आणि बाबुराव कस्तुरे यांनी विठ्ठल रुक्मिणीची चांदीची मूर्ती भेट देऊन यथोचित सत्कार केला. प्रदीप कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून बांधकामाची माहिती दिली तर चंद्रचूड चव्हाण यांनी मंदिराच्या विकास कामाला मदत करण्याची विनंती केली. याप्रसंगी गोपाळ शेंडगे, भागवत गीते, दत्तात्र्य भंडारे, अमर चव्हाण, वामन संपत्ते, हरिकृष्ण गुरले, गणेश तूरूप, दत्ता आंबेकर, प्रकाश गालफाडे, भागवत गडगिळे, अँड माधव गुडे, गोविंद नरहरे, दिगंबर येडले, संतोष तूरूप, जयराम जाधव, मारुती गालफाडे, शीला आचार्य, योगीराज शिरसाट, वीरेंद्र चव्हाण, अँड. बोराडे, नाथराव गीते, प्रसाद गीते, शिवाजी जाधव, उद्धव बरुळे, अँड किशोर श्रीगिरे, बंडू गुरव, रमेश केंद्रे, राजू भंडारे, ज्ञानेश्वर रामरूळे यांच्यासह मंदिर ट्रस्टचे सदस्य पानगाव येथील ज्येष्ठ नागरिक भाविक भक्त भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.