उदयगिरीचा क्रिकेट संघ विभागीय स्पर्धेसाठी निवड

उदयगिरीचा क्रिकेट संघ विभागीय स्पर्धेसाठी निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र उदयगिरी कनिष्ठ महाविद्यालय, उदगीरच्या खेळाडूंनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा. व जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत लातूर येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत 19 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच सदर खेळाडूंची निवड नांदेड येथे होणाऱ्या विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी झाली आहे. या विजेत्या संघात स्वप्निल कुमठेकर, राज कांबळे, रणजीत बिरादार, प्रज्वल मुद्देवाड, सुमित कोकरे, गोपीनाथ टाले, ज्ञानराज धायगुडे, स्वप्निल पवार, सय्यद अयान, प्रदीप परिहार, अविष्कार माने, वरद पटवारी, हर्षवर्धन नरवटे, शार्दुल शेख, रितिक कांबळे या खेळाडूंचा समावेश आहे. या विजयी खेळाडूंना प्रा.रोहन येनाडले, क्रीडा संचालक प्रा.सतीश मुंढे यांनी मार्गदर्शन केले. त्याबद्दल विजेत्या खेळाडूंचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अ‍ॅड.प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अ‍ॅड.एस.टी.पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!