उदगीर – जळकोट मतदार संघातील विविध गावांसाठी ६ कोटी ६० लक्ष रूपयांचा निधी मंजूर – ना. संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभाग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत उदगीर – जळकोट मतदार संघातील विविध गावांसाठी ६ कोटी ६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. मनरेगा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे हा महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा वास्तविक उद्देश असून त्या अनुषंगाने ग्रामपंचायत मार्फत विविध कामांच्या मागणी केल्यानंतर संबंधित कामास प्राधान्याने मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये उदगीर व जळकोट तालुक्यातील विविध गावातील विकास कामांसाठी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण व बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाने ६ कोटी ६० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये उदगीर – जळकोट तालुक्यातील गावाकरीता निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यामध्ये उदगीर तालुक्यातील मलकापूर गावात सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १ कोटी ४५ लक्ष रु., तोगरी येथे सिमेंट रस्ता करण्यासाठी १० लक्ष रु., सोमनाथपुर येथे सिमेंट रस्ता करण्यासाठी १० लक्ष रु., शंभुउमरगा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाक बसविण्यासाठी १० लक्ष रु., मादलापुर सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाक बसविण्यासाठी १० लक्ष रु., नागलगाव येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाक बसविण्यासाठी १० लक्ष रु., तोंडचिर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाक बसविण्यासाठी १५ लक्ष रु., निडेबन येथे सिमेंट रस्ता करण्यासाठी २० लक्ष रु., वाढवणा बु. येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., हंडरगुळी येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., हेर येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., नळगीर येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १५ लक्ष रु., करडखेल येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., देवर्जन येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., रावणगाव येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., डोंगरशेळकी येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., डाऊळ येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., गुडसुर येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., अवलकोंडा येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., उदगीर तालुक्यातील विविध गावांसाठी ३ कोटी ६५ लक्ष रुपयाचा निधी तर जळकोट तालुक्यातील गव्हाण येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी ३० लक्ष रु., हाळदवाढवणा गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी ३० लक्ष रु., वडगाव येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., केकतसिंदगी येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., शेलदरा येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., धामणगाव येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., होकर्णा येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., पाटोदा बु. येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., उमरगा रेतु येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी २० लक्ष रु., रावणकोळा येथील (बालाजीनगर तांडा, देवनगर तांडा) येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., शिवाजीनगर तांडा येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., हावरगाव येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., धामणगाव ( नवी आबादी) येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., गुत्ती येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., जगळपुर
येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., मंगरूळ येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., डोंगरकोनाळी येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., कोळनुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १५ लक्ष रु., डोंगरगाव येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., विराळ येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., रावणकोळा येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., ढोरसांगवी येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., आतनुर येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., डोमगाव येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., तिरुका येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., जिरगा येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक बसविण्यासाठी १० लक्ष रु., असे जळकोट तालुक्यातील विविध गावांसाठी २ कोटी ९५ लक्ष रुपये असे एकुण उदगीर व जळकोट मतदार संघातील गावांसाठी ६ कोटी ६० लक्ष रूपयांचा निधी ना.संजय बनसोडे यांनी मंजूर केल्याबद्दल ग्रामीण भागातील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.