माजी विद्यार्थी संघ जयक्रांती अध्यापक महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात साजरा

माजी विद्यार्थी संघ जयक्रांती अध्यापक महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात साजरा

लातूर (प्रतिनिधी) : माजी विद्यार्थी संघ जयक्रांती अध्यापक महाविद्यालय यांच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व माजी विद्यार्थी संघ पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला उद्घाटक म्हणून लातूर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष कार्यतत्पर आणि अगदी अल्पावधीतच आपल्या कार्याने आपल्या स्वतःची ओळख सर्वदूर पर्यंत निर्माण करणाऱ्या लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा.सौ l.वर्षा ठाकूर-घुगे तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाड्यातील सुप्रसिद्ध निवेदक, कवी श्री महेश अचिंतलवार सर (संभाजीनगर) यांची उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह देवून संपन्न झाला.

यावेळी मंचावर जयक्रांती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.बालाजी घार साहेब जयक्रांती शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.गोविंदजी घार साहेब, जयक्रांती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.अजित भैय्या घार, जयक्रांती कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य मा.श्री.प्रशांत घार सर, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष श्री.बालाजी कांबळे, माजी विद्यार्थी संघ सचिव श्री.मोहन कांबळे, जयक्रांती वरिष्ठ महाविद्यालय प्राचार्य डॉ.श्रीधर कोल्हे, जयक्रांती अध्यापक महाविद्यालय प्राचार्य डॉ प्रमोद तांदळे जयक्रांती अध्यापक विद्यालय प्राचार्य विक्रम जाधव, API दयानंद पाटील IQAC सेलच्या प्रभारी डॉ.वैशाली येसके मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघाच्या या स्नेहमेळाव्याप्रसंगी बोलत असताना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी माजी विद्यार्थी संघाचे विशेष कौतुक करत तरुणाईने समाजाला एक वेगळा आदर्श घडावा अशा पध्दतीने वाटचाल करायला पाहिजे तसेच जीवनाच्या वाटचालीत माणसाच्या तीन अवस्था असतात ज्या की बाल्यावस्था,तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था असतात यापैकी तारुण्यावस्थे मध्ये मनात जो सकल्प कराल तो पूर्णत्वास घेऊन जाण्याची तयारी असते म्हणुन आजची तरुणाई जागरूक असणं फार महत्त्वाचं आहे असा मोलाचा संदेश उद्घाटनपर मनोगत व्यक्त करतांना दिला. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महेश अचिंतलवार यांनी “सुख ऑनलाईन आहे” या कार्यक्रमात जीवनात प्रत्येक क्षणाला आनंद शोधला पाहिजे व कोणतीही गोष्टीची जास्ती प्रमाणात अपेक्षा न करता मिळालेल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान म्हणून त्यातून आनंद व्यक्त केला पाहिजे जीवनाकडे एकंदरीतच सकारात्मक नजरेतून प्रचंड इच्छाशक्तीने आपले जीवन जगलं पाहिजे असा मौलिक संदेश देत प्रशिक्षण व त्यांची मने जिंकली. आणि संस्थेचे सचिव गोविंदरावजी घार साहेब यांनी माजी विद्यार्थी संघाने केलेल्या या कार्यक्रमाचे विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष बालाजी कांबळे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी सुळ यांनी केले आणि आभार माजी विद्यार्थी संघ सचिव मोहन कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.प्रज्ञा स्वामी, श्री गोविंद कांबळे, प्रा.नीता परदेसी, श्री.बुद्धभूषण रायबोळे, योगेश पुणेकर सर, प्रा.सोमनाथ पवार, प्रा.शरद पाडे, प्रियंका बनसोडे, राजु रायबोळे सर, नवनाथ दिक्षीत सर इत्यादींनी योगदान दिले.

About The Author