अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाची सुप्रिया साबळे स्वारातीमविच्या कला शाखेतून सर्वतृतीय
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सुप्रिया बालाजी साबळे ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. पदवी परीक्षा २०२३ मध्ये विद्यापीठातून सर्व तृतीय आली असून, महाविद्यालयाच्या गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत ‘फुले पॅटर्न’ चा ‘दबदबा_ अबाधित ठेवलाय. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नियोजनबद्ध कुशल मार्गदर्शनाखाली महात्मा फुले महाविद्यालयाने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रात ‘फुले पॅटर्न ‘ निर्माण करून ज्ञान पंढरी अहमदपूरचे नाव लौकिक केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच गुणवत्ता यादी जाहीर केली असून, महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सुप्रिया बालाजी साबळे बी. ए. पदवी परीक्षेत विद्यापीठातून सर्व तृतीय आली असून तिचा पालकासह सत्कार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुप्रिया साबळेसह तिच्या विषयाचे प्राध्यापक प्रा. अतिष आकडे, डॉ. बब्रुवान मोरे, डॉ. प्रकाश चौकटे,सुप्रिया साबळे यांच्या आई सौ. महानंदा साबळे यांचा सत्कार प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी केला. तसेच, किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच सचिव ज्ञानदेव झोडगे गुरूजी,सहसचिव, कोषाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मराठी विभागातील प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर आभार डॉ. बब्रुवान मोरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.