मजविपच्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

मजविपच्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शालेय व महाविद्यालयीन गटातील निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयात उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. रामप्रसाद लखोटिया होते. शालेय गटात प्रथम लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा कुणाल विष्णू पाटील रोख तीन हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र ,द्वितीय छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाचा बोधवापोड कार्तिक राजीव रोख दोन हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय शामर्या कन्या विद्यालयाची समीक्षा श्रीकृष्ण परगे, रोख एक हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ छत्रपती राजर्षी शाहू सैनिक विद्यालयाचा अभिषेक साईनाथ झीलकरवार रोख पाचशे रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास केंद्र प्रणिता बुद्धिवंत रोख पाचशे रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, महाविद्यालयीन गटात संत तुकाराम विधी महाविद्यालयाची अर्गीता नंदप्रकाश विश्वनाथे रोख तीन हजार रुपये, स्मृतीचिन्ह ,प्रमाणपत्र ,द्वितीय रेणुका राजकुमार जाधव श्री हावगिस्वामी महाविद्यालय रोख दोन हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय श्री हावगीस्वामी महाविद्यालयाची प्रांजल संतोष स्वामी रोख एक हजार रुपये, स्मर्तिचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय उदगीर पोगा ऋषिकेश बालू पाचशे रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, संत तुकाराम विधी महाविद्यालयाची बिरादार श्रद्धा सुनील हीस रोख पाचशे रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्रामात लातूर जिल्ह्याचे योगदान आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवर युवकांची विकासात्मक भूमिका या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे परीक्षण प्रा. अर्जुन सोमवंशी, बाबुराव माशाळकर, प्रा. डॉ.नरसिंग कदम ,प्रा. विलास गाजरे यांनी केले. शहरातील विविध अडोतीस शाळा, महाविद्यालयातील चाळीस हजार विद्यार्थ्यांमध्ये गाथा मुक्ती लढ्याची व्याख्यान देणारे वक्ते विशाल तोंडचिरकर, प्रा. डॉ.गौरव जेवळीकर ,बालाजी मूस्कावाड ,प्रा.डॉ. दत्ता हरी होनराव, प्रा. धनराज बंडे, मुरलीधर जाधव, राजेंद्र चव्हाण आणि समन्वयक राम मोतीपवळे,विश्वनाथ बिरादार माळवाडीकर यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच स्पर्धेचे प्रायोजक अनिल पत्तेवार ,विशाल तोंडचिरकर ,प्रा. डॉ. एस .एन .शिंदे यांचाही प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शाळा महाविद्यालयामध्ये व्याख्यानमाला आयोजित केल्याबद्दल उपप्राचार्य डॉ. आप्पाराव काळगापुरे, मुख्याध्यापक ए. बी. हक्के, अनिता येलमटे ,बाबुराव पाटील, प्रतीक्षा मुंडकर ,शंकर हम्पले यांना प्रतिनिधीक स्वरूपात सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुशांत शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास विद्यार्थ्या पर्यंत नेऊन जनजागृती केल्याबद्दल मराठवाडा जनता विकास परिषदेचे कौतुक केले, परिस्थितीचा बाऊ न करता विद्यार्थ्यांनी पुढे जाण्याचे आवाहन केले, स्तुत्य उपक्रमाबद्दल तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी विद्यार्थी व संस्थाचालक, शिक्षकांचे अभिनंदन केले. समारोपात डॉ. लखोटिया यांनी स्वराज्याचे सूराज्यात रूपांतर होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले. स्वागत गीत रेखा माने यांनी गायले. प्रास्ताविक प्रा. एस .एस. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जाहूरे यांनी केले. आभार राम मोतीपवळे यांनी मानले.

About The Author